जळगावसामाजिक

आधी लगीन वक्फ चे नंतर आमचे – साकिब व अलिमुन्निसा

वक्फ बचाव समिती तर्फे लग्न कार्यात सुद्धा जन जागृती

जळगाव – जिल्हाभर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली वक्फ कायदा २०२५ च्या विरोधात जनजागृतीचे कार्य सुरू असून जळगाव जिल्ह्यात सुद्धा वक्फ बचाव समितीच्या माध्यमाने हे कार्य सुरू आहे.

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत खंडवा येथून अब्दुल अझीझ हे आपला मुलगा साकिब ची वरात घेऊन उमर खय्याम यांची मुलगी अलिमुन्निसा च्या वैवाहिक कार्यक्रमासाठी आले होते.

या लग्न समारंभात वक्फ बचाव समितीचे मुफ्ती खालीद, फारुख शेख, सैयद चांद, अनिस शहा उपस्थित होते. मुफ्ती खालिद व फारुक शेख यांनी वक्फ कायदा हा कसा धोकेदायक व मुस्लिम समाजाच्या अस्मिते विरोधात आहे तसेच मस्जिद, कब्रस्तान, इदगाह, मदरसा यांच्यासाठी कसा धोकेदायक आहे हे पटवून दिले त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधान विरोधी असल्याने त्याचा एकत्रितपणे निषेध करण्याचे आवाहन यावेळी मुफ्ती खालीद व फारुख शेख यांनी उपस्थितांना केले.

 

आधी लगीन वक्फ कायद्याचे नंतर माझे नवरदेव साकिब ची प्रतिक्रिया

नवरदेवांचे मांडवात आगमन झाल्यावर फारुख शेख हे उपस्थितांना वक्फ कायद्याची माहिती देत असताना नवरदेवला बघून ते थांबले असता नवरदेव साकिब अजीज यांनी फारुक शेख यांना सांगितले की माझे लग्न उशिरा झाले तरी चालेल परंतु माझ्या लग्नातील वराडी मंडळीला वक्फ म्हणजे काय ? त्याचे दुष्परिणाम काय? हे समजणे महत्त्वाचे आहे म्हणून आधी लगीन वक्फ चे लावा त्यानंतर माझे असे बोलल्यावर सुमारे 30 मिनिटे फारुक शेख यांनी उपस्थित पाहुणे मंडळीला मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button