

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये महान क्रांतिकारक, आदिवासी वीर धर्मगुरू बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, देशभक्तीपर गीतं आणि घोषवाक्य सादर केले. उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी त्यांच्या पराक्रमाची, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका आणि समाजजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या निमित्ताने “आदिवासी समाजाचा अभिमान – बिरसा मुंडा” हा संदेश विद्यालयाच्या आवारात घुमला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपस्थित सर्वांनी देशाच्या आदिवासी वीराला विनम्र अभिवादन केले.




