जळगावप्रशासकीय

यावल न्यायालयाचा अभिनव उपक्रम

यावल – यावल तालुक्यातील फैजपूर येथे होळी नंतर सुरू होणाऱ्या आठ दिवसीय खंडेराव महाराज यात्रेमध्ये यावल न्यायालयातर्फे विधी सेवा समिती स्टॉल उभारण्यात आला.

फैजपूर तालुका यावल येथे दरवर्षी खंडेराव महाराज देवस्थानच्या माध्यमातून यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. या यात्रेसाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक हजारोच्या संख्येने खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी तसेच यात्रेसाठी फैजपुरात येत असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध गृह उपयोगी वस्तूंची खरेदी विक्री साठी महिला भगिनींची मोठी गर्दी या यात्रेमध्ये असते. शिवाय सातपुडा परिसरातील आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या बाजारानंतर होणाऱ्या या यात्रेत आदिवासी बंधू मोठ्या संख्येने सामील होत असतात. त्या अनुषंगाने यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री.आर.एस.जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार यावल न्यायालयाने यंदा प्रथमच विधी सेवा देणाऱ्या तसेच विधी सेवा संबंधी माहिती आणि मार्गदर्शन देणाऱ्या स्टॉलची उभारणी केली होती. या स्टॉलच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, महिला व बालक यांच्या संरक्षणासंबंधी कायदे, रॅगिंग, मनोरुग्णांसाठी चे कायदे, सक्तीच्या व विनामूल्य शिक्षणाचा अधिकार, गर्भलिंग निदान कायदा तसेच राष्ट्रीय विधी सेवा समिती द्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यावल न्यायालय नेहमीच अशा विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी आपले न्यायालयीन कामकाज आटोपून यावल तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर.एस.जगताप आणि सहदिवाणी न्यायाधीश श्री.जी.आर.कोलते साहेब यांनी फैजपूर येथे स्वतः उपस्थित राहून या उपक्रमाची पाहणी केली आणि विधी सेवा समितीच्या स्टॉलच्या माध्यमातून स्वतः भाविकांना विधी विषयक पत्रकांचे वाटप केले. या उपक्रमाचा यशस्वीतेसाठी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. संजीव तडवी तसेच समांतर विधी सहाय्यक श्री. शशिकांत वारूळकर अजय बढे आणि हेमंत फेगडे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button