जळगावशैक्षणिक

सायबर सुरक्षा जनजागृती विषयी मार्गदर्शन चर्चा सत्र संपन्न

जळगाव – नंदिनीबाई गर्ल्स स्कूल येथे इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. २२ जुलै, बुधवार, दुपारी ३.०० ते ४.०० वाजेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यामध्ये ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित २५० विद्यार्थ्यांना करण्यात आले.

संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबतची माहिती जाणून घेतली तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा या अभियाना प्रसंगी संकल्प केला.

या चर्चासत्रास नंदिनीबाई गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. राणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button