जळगावआरोग्य

मंत्री गिरिष महाजन यांच्या मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत २६ रुग्णांची यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया

जळगाव : मंत्री गिरिष महाजन यांच्या मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात २६ नेत्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया   डॉ. प्रवीण पाटील (नेत्रतज्ज्ञ), डॉ. वैभव पांडे, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. सृष्टी फिरके या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्टाफ इनचार्ज सिस्टर निशा गाडे, नेत्र चिकित्सा अधिकारी विलास बाविस्कर (पहुर), भारती वाणी, अनंत लांडगे, स्टाफ सिस्टर सुनिता वक्ते आणि मयुरी हिवरडे यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आल्या.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील, दीपक पाटील यांनी विशेष योगदान दिले.या उपक्रमामुळे मोतीबिंदूग्रस्त रुग्णांना प्रकाशाचा नवा किरण मिळाला असून, गरजू रुग्णांसाठी ही मोफत सेवा मोठा दिलासा ठरत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button