

जळगाव – एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, गोपनीय विभागातील प्रदिप पाटील, अभिजीत सौंदाणे, मंदार पाटील व ठाणे अंमलदार विजय पाटील, दत्तात्रय चौधरी आदि उपस्थित होते.




