जळगावशैक्षणिक

श्री चामुंडामाता होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

जळगाव : श्री चामुंडामाता होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चिंचोली जळगांव येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला. श्री चामुंडामाता होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव संस्थेचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील साहेब व संस्थेचे सचिव राहुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.

प्रथम वर्षाचे विद्यार्थीनी रूचा वाणी, शीतल खामट, खुशबु यादव, मानसी बावीस्कर, वैभव सानप, आफरीन शेख, युक्ता मोरे, अस्मीत बागुल, व्दितीय वर्षाची विदयार्थीनी मनस्वी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. ‘श्री चामुंडामाता होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव संस्थेचे अध्यक्ष  पी. ई. तात्या पाटील व संस्थेचे सचिव राहुल पाटील साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्राबददल माहीती सांगीतली. तसेच महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय जाधव यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगुन मोलाचे मार्गदर्शन केले. आणि डॉ. जयेश वाल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवुन त्यांना प्रेरित केले.

या वेळी डॉ. सुरेश अग्रवाल डॉ. संदिप पाटील, डॉ. दिपक पाटील, डॉ. नरेद्र शर्मा, डॉ. अमिता श्रीवास्तव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी चिंतानिका कोल्हे यांनी सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button