क्रिडाजळगाव

वर्षा सोनवणे व इमरान बिस्मिल्ला या हॉकी खेळाडूंची लेवल टू अभ्यासक्रमात यशस्वी कामगिरी

जळगाव – पुणे येथे हॉकी महाराष्ट्र व हॉकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे ७ ते ९ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हॉकी झोनल लेवल टू या विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमात जळगाव जिल्ह्यातील दोन चमकते खेळाडू वर्षा सोनवणे व इमरान बिस्मिल्ला यांनी यशस्वी सहभाग नोंदवला आहे.

या दोघांनी मागील वर्षी लेवल वन अभ्यासक्रमही यशस्वीरित्या पूर्ण केला होता. यंदाच्या लेवल टू प्रशिक्षणामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळवले. या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय पंच व खेळाडू रिपुदमन आयएएस, फहीम खान आणि दीपक जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी कामगिरीबद्दल हॉकी जळगावच्या वतीने वर्षा व इम्रान यांचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, प्रशिक्षिका हिमाली बोरोले, ममता प्रजापत, भावना कोळी यांची उपस्थिती होती. वर्षा व इम्रान यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्यातील हॉकी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button