*जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक, आणि दिव्यांग असे 1574 पात्र मतदारांनी केले घरी बसल्या मतदान*


*जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक, आणि दिव्यांग असे 1574 पात्र मतदारांनी केले घरी बसल्या मतदान*
जळगाव दि. 14 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणारे वयाची 85 वर्ष पेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या मतदारांचे गृह भेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. जळगाव जिल्ह्यात गृह मतदानाला शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात 1694 मतदारांपैकी आतापर्यंत 1574 मतदारांनी घर बसल्या मतदान केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, कोविड किंवा दीर्घ आजाराने बाधित असलेले रुग्ण यांचे गृहभेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण 1632 मतदारांना घरी बसल्या मतदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यासाठी 100 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचे फौज जिल्हाभरात तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत भुसावळ विधानसभा मतदारसंघात 191मतदारांनी घरी बसून मतदान केले आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 162 मतदारांनी घरून मतदान केले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात 195मतदारांनी घरून मतदान केले आहे.. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 102 मतदारांनी घरी बसल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. पाचोरा मतदार संघात आज गुरुवार 14 नोव्हेंबर पर्यन्त 211 मतदारांनी घरून मतदानाचा हक्क बजावला आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आता पर्यंत 106 मतदारांनी घरून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 179 मतदार यांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 132 मतदार यांनी गृह मतदान केले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 169 मतदार यांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. चोपडा विधानसभामतदारसंघात 67 तर जळगांव शहर मतदार संघात 60 मतदारांनी गृह मतदान केले आहे.




