जळगावराजकारण

मनसेच्या जळगाव शहर प्रसिद्धी प्रमुखपदी सतीश सैंदाणे 

जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर प्रसिद्धी प्रमुखपदी सतीश सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवीन पदभार स्वीकारल्यावर बोलतांना सतीश सैंदाणे यांनी सांगितले की,  प्रसिद्धी प्रमुख हे कोणत्याही पक्षाचे जनसंपर्काचे प्रमुख असल्याचे मानले जाते. पक्षाची भूमिका, धोरणे, आंदोलनं आणि सामाजिक कार्य यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसिद्धी प्रमुख पार पाडत असतो. यामुळे पक्षाची प्रतिमा अधिक व्यापक होत असते. याप्रसंगी मनसेच्या कार्याची सकारात्मक छबी शहरभर पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी केला. तसेच “माध्यमे आणि समाजमाध्यमांद्वारे मनसेच्या निःस्वार्थ कार्याचा प्रकाश टाकणे हीच माझी प्राथमिक जबाबदारी असेल.” असेही ते म्हणाले.

या वेळी शहरातील मनसेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतीश सैंदाणे यांच्या सारखे उत्साही कार्यकर्ते जेव्हा प्रसिद्धी प्रमुखासारखी जबाबदारी स्वीकारतात, तेव्हा पक्षाची ताकद जनतेमध्ये अधिक प्रभावीपणे पोहोचते. मनसेच्या विचारधारेचा आवाज आता अधिक प्रभावीपणे घराघरात पोहोचेल, अशी अपेक्षा याप्रसंगी जिल्हाध्यक्ष  ॲड जमील देशपांडे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button