जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये गणित , भूगोल,विज्ञान मंडळाची स्थापना

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये मध्ये गणित मंडळ , भूगोल मंडळ विज्ञान मंडळ स्थापन करणे हा विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण करण्याचा आणि त्या विषयाबद्दल नैपुण्य वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विविध मंडळ विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाचे पैलू एक्सप्लोर करण्यासाठी, समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आणि त्या विषयाच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक मजेदार आणि आकर्षक व्यासपीठ उपलब्ध करून देते.विषय मंडळे शालेय अभ्यासक्रमाला पूरक ठरते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येतो.मंडळाचे अध्यक्ष म्हणून गणित मंडळाध्यक्ष दिनेश पाटील सर भूगोल मंडळाचे अध्यक्ष श्रीमती सरला पाटील मॅडम व विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती साधना मॅडम यांची मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली.पाचवी ते दहावीच्या वर्गातील प्रत्येक दोन मुलांची निवड करण्यात आलेली आहे.

सर्व मंडळाच्या सदस्यांचे स्वागत मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले.विविध मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबवले जातील असे मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button