

जळगाव – समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतरही परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे ईश्वर पढार, बोदवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश चाटे, विष्णू चकोर, जामनेरचे कृषी अधिकारी राजेशकुमार सदाशिव ढाकणे, माऊली मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉ गजानन परखड, सिनेट सदस्य वैशाली मनोज वराडे, चिंचोलीच्या सरपंच शोभाबाई मिलिंद लाड, एरंडोलचे विठ्ठल आंधळे, माजी अध्यक्ष रमेश वंजारी, पाटणादेवी येथील माजी सरपंच विलास सोनवणे, आत्माराम वंजारी सर यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमात दहावी, बारावी व इतरहि परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळालेल्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच महावितरणचे सेवानिवृत्त वाहन चालक रामचंद्र पुंडलिक वंजारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनंदा मधुकर नाईक यांचादेखील सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य वैशाली मनोज वराडे यांना सन 2025 समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले, प्रस्तावनेत त्यांनी संघटनेच्या कामाविषयी आढावा घेऊन कार्यक्रमाविषयी माहिती दिली. नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न सुरू ठेवावे यशाचे शिखर नक्की सर करता येते. तसेच सर्वांनी सद्भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. पायल वराडे या विद्यार्थिनीने देखील समाज बांधवांसमोर तिचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी तर आभार प्रशांत नाईक यांनी यांनी मानले. कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, सचिव महादू सोनवणे व सर्व संचालक उमेश आंधळे, संतोष घुगे, भानुदास नाईक, प्रवीण सानप, नंदू वंजारी, समाधान चाटे, सचिन ढाकणे, रामेश्वर पाटील, यश साऊंड सिस्टिम चे संचालक संतोष चाटे, मुकेश टेन्ट हाऊस, माऊली मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला किशोर पाटील जामनेर, वैभव वंजारी अंतुर्ली, कैलास वंजारी मुक्ताईनगर, उमेश आव्हाड पाटणादेवी, देवानंद वंजारी, वैभव वंजारी, कैलास पालवे, सुरेश सांगळे एरंडोल, राजू काळे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील वंजारी समाजातील मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.




