

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल, अर्थ, पाटबंधारे, कृषी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे गणवेश वाटप व शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष व विद्यालयाचे सचिव अशोक लाडवंजारी यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात इयत्ता १ वी ते १० वी पर्यंतच्या एकूण २०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधत विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, महानगराध्यक्ष एजाजभाई मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, श्रीराम विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, सचिव अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस वाय.एस. महाजन, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, माजी नगरसेवक सुनील माळी, डॉ. रिजवान खाटीक, राजुभाऊ मोरे, अरुण मेटकर, इब्राहिम तडवी आदींसह विद्यालयाचे संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम व सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी प्रमोद पाटील व वाय.एस. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात ॲड. रविंद्र पाटील यांनी माननीय एकनाथराव खडसे यांच्या शेतकरीहितैषी कार्याची सविस्तर माहिती देत सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी श्री अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी, उपप्रमुख सरस्वती पाटील, प्रा. प्रतिभा पाटील व दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले तर आभार अमित तडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी, मुख्याध्यापक दिवाकर जोशी, शिक्षकवर्ग तसेच नाथ फाउंडेशनचे सहकार्य लाभले




