जळगावसामाजिक

फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक फाउंडेशनतर्फे बाबासाहेबांना मानवंदना

बाबासाहेबांचे विचार व संविधान मूल्यांचा अंगीकार करा - अमोल कोल्हे

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक महापुरुष फाउंडेशनच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. हरी विठ्ठल नगर, बाजारपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली.


सायंकाळी बाबासाहेबांची प्रतिमा सुशोभित केलेल्या वाहनावर ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रिझर्व बँक, विजयस्तंभ यांची प्रतिकात्मक मांडणी करण्यात आली होती. तसेच “आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे” हा संदेश देत भाकरीचे आकर्षक डेकोरेशन करण्यात आले होते, जे फिरत्या स्वरूपात सादर करण्यात आले. डीजेच्या तालावर नाचत व आतषबाजीच्या जल्लोषात मिरवणूक पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते कैलास हटकर, संविधान जागर अभियानाच्या सरोजिनी लभाणे व निखिल रांजणकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना तसेच त्रिसरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकाने संविधानिक मूल्ये आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सरोजिनी लभाणे व निखिल रांजणकर यांनी संविधान जागर अभियानाबाबत मार्गदर्शन करून जनजागृतीची आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या झनके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंदना वानखेडे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश झिने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी प्रशांत इंगळे, आकाश सपकाळे, आकाश तायडे, सागर साळुंखे, अक्षय सपकाळे, अभय सपकाळे, प्रेम सुरवाडे, भारत रंधे, लकी रंधे, सिद्धू झिने, ईश्वर सपकाळे, प्रशांत तायडे, सुभाष झिने, संजय सोनवणे, समाधान सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगल मैत्री ग्रुपच्या प्रमिला इंगळे, उषा इंगळे, छाया इंगळे, शोभा इंगळे, शैला पारधे, शोभा पाटोळे, विद्या झनके आदी महिलांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button