

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे अकराव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि. ०९/०९/२०२५ मंगळवार रोजी आयोजन करण्यात आलेले होते. या परिषदेने नुकतीच दशकपूर्ती केलेली आहे. या परीषदेत सुमारे ५० संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. या परीषदेचे उदघाटन डॉ. मोहनभाऊ फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महेशभाऊ फालक (चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), विष्णूभाऊ चौधरी (सेक्रेटरी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रियंका व्ही. बऱ्हाटे(शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेज जळगाव), उप प्राचार्य प्रा. डॉ. गजेंद्र आर. वाणी, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य वाय. एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील, डेटा सायंन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, एमसीए समन्वयक प्रा. हर्षल व्ही. पाटील, परिषदेच्या सचिव डॉ. स्वाती पी. फालक, परिषद समन्वयक प्रा. पूनम एम. महाजन, परिषद सहसमन्वयक प्रा. मेघा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ही परीषद एकूण तीन सत्रात संपन्न झाली.
प्रथम सत्रात प्रा. डॉ. प्रियंका व्ही. बऱ्हाटे यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात प्रा. डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी Mango Fruit Disease Identification using Image Processing and Machine Language या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले आणि संशोधन कसे करावे व होणाऱ्या चुका टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स सांगितल्या.
परिषदेच्या व्दितीय सत्रामध्ये संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी सेशन चेअर म्हणून प्रा. डॉ. सीमा राणे यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले.
परीषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये निरोप समारोह संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र वाणी उपस्थित होते.
सहभागी प्रा. पुनम इंगळे यांनी परिषदेचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले असे आपल्या अभिप्रायात नमूद केले. सहभागी विद्यार्थिनीने आजची परिषद ही विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त झाली असा अभिप्राय दिला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले.
सदर परिषदेचे संयोजक प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र आर. वाणी, प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, प्रा. हर्षल व्ही. पाटील, आयोजन समिती सचिव डॉ. स्वाती पी. फालक यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. पूनम एम. महाजन, सह समन्वयक प्रा. मेघा चौधरी व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली.




