

जळगाव – साधारणतः दोन वर्षापासून राष्ट्रीय हिंदू संघटन मूळ प्रयागराज येथील विस्तारास सुरुवात झाली. माननीय श्री. विजय कुमार शर्माजी हे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवड झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रा.सुरेश वाघ, सेवानिवृत्त प्राचार्य यांची प्रयागराज येथून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री सत्येंद्रजी यांनी निवड करून लेखी स्वरूपाचे पत्र संघटनेस प्राप्त झाले.
श्री सुरेश वाघ यांची शैक्षणिक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने संघटन कौशल्य त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीसाठी अहोरात्र प्रयत्न शील असतात.
हिंदु राष्ट्र ऐक्य अबाधित राहण्यासाठी, युवा पिढी सक्षम व संस्कारशील बनवून धर्म प्रेरित करावी. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अन्नदानाचा संकल्प, गो रक्षा तथा सनातन धर्म रुजवण्या साठी व अन्याया विरुद्ध ठोस पावले उचलून न्यायासाठी झटणार असल्याचा मानस त्यांचा आहे.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून त्यांचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
जळगाव शहरात संघटनेचे कार्य विस्तारासाठी संघटन कौशल्य असलेले कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत निवड करून तरुण वर्गाला सुद्धा जबाबदारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुख नेमणूक करून कार्याला गती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणी तथा जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारणी तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




