जळगावसामाजिक

ओपन स्पेस वापराची चौकशी करण्याची हितेंद्र टेकावडेंची मागणी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडाच्या वापराबाबत चौकशी करण्याची मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे कार्यकर्ते हितेंद्र टेकावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर दीपमाला  काळे आणि आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महानगरपालिकेचे सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था किंवा समाज मंडळांना करार पद्धतीने दिलेले खुले भूखंड कराराच्या अटींचे उल्लंघन करून वापरले जात असल्याचा आरोप केला होता.

या पार्श्वभूमीवर पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक २७, निवृत्ती नगर तसेच गट क्रमांक २६ मधील प्लॉट क्रमांक १४ व १६/४ लगत असलेल्या खुल्या भूखंडाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित भूखंड एका सामाजिक संस्थेला करारावर देण्यात आला असून, त्या ठिकाणी समाज बांधवांसाठी समाज मंदिराची वास्तू उभारण्यात आली आहे.

मात्र, सदर वास्तू व खुल्या भूखंडाचा वापर सामाजिक कार्यासाठी न होता एका शैक्षणिक संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून वास्तव समोर आणावे, अशी मागणी हितेंद्र टेकावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, गेल्या वर्षभरात संबंधित वास्तू व खुल्या भूखंडाचा समाज बांधवांच्या सामाजिक कार्यासाठी किती आणि कशाप्रकारे उपयोग झाला, याबाबतचे पुरावे व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button