जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा 

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता वानखेडे होत्या. त्यांच्या शुभहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सु. प्राध्यापिका सुवर्णा अहिरे तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अनिता वानखेडे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांना ‘सिंबॉल ऑफ नॉलेज’ असे का म्हटले जाते, तसेच समाजातील गरीब, वंचित, दलित घटकांसाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जातीयता, अस्पृश्यता आणि अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करून सर्वांना संविधानातील समानतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष विद्यार्थी-शिक्षक अक्षय जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉ. नारायण खडके यांनी मार्गदर्शन व परवानगी दिली. तसेच डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री. अरविंद पवार, श्री. पंकज वाघ, श्री. चंद्रकांत सपकाळे तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button