जळगावसामाजिक

मेहरूण येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

माजी महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते पूजन; ५१ महिला भाविक पारायणासाठी सहभागी

मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर चौक, मेहरूण येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. सप्ताहाचे प्रारंभिक पूजन जळगावचे मा. महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर ज्ञानेश्वरी पारायणास विधिवत सुरुवात करण्यात आली.

या ज्ञानेश्वरी पारायणासाठी परिसरातील ५१ महिला भाविक भक्तिभावाने सहभागी झाल्या असून, पोथी वाचन पंढरीनाथ महाराज यांच्या वाणीतून होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत भाऊ नाईक यांनी केले आहे.

कार्यक्रमाला नगरसेवक,राजेंद्र घुगे पाटील व नगरसेविका निकिता ताई वंजारी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच पाटील ज्ञानेश्वर महाराज, शेलवड येथील महाराजांसह यांची उपस्थिती लाभली. परिसरातील विविध भजनी मंडळी व भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम संकीर्तन आणि भक्तिमय वातावरणामुळे श्री संत ज्ञानेश्वर चौक परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रशांत भाऊ नाईक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button