जळगावसामाजिक

स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती निमित्त भव्य रॅली व लेझीम पथकाचे आकर्षण

जळगाव : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या 76 व्या जयंती निमित्त यावर्षी जळगाव शहरात लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिवतीर्थ मैदान, कोर्टाजवळ येथे सकाळी ९ वाजता रॅलीचा शुभारंभ झाला. समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच मुंडे साहेबांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने रॅलीत उत्साहाचे वातावरण होते.

संत ज्ञानेश्वर प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व श्रीराम कन्या प्राथमिक-माध्यमिक विद्यालय यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध प्रदर्शनामुळे रॅलीला विशेष शोभा प्राप्त झाली. दुपारी १:०० वाजता रॅलीचा समारोप लाडवंजारी समाज मंगल कार्यालय, मेहरूण येथे झाला. त्याच ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे मार्गदर्शन श्री. भानुदास भास्कर नाईक व श्री. किशोर नारायण ढाकणे यांनी केले. शिबिरात रेड क्रॉस ब्लड बँक, जळगाव यांच्या सहकार्याने एकूण २० समाज बंधूंनी रक्तदान केले. रॅलीनंतर उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था होती.

माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जयेश भावसार, राहुल वाघ, विनोद मराठे, महादू सोनवणे, नितीन इंगळे, संदीप ढडोरे, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, माजी महापौर कैलासअप्पा सोनवणे, माजी नगरसेवक भरत सपकाळे, ईबा पटेल, दिपक बाविस्कर, किशोर ढाकणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, संजय घुगे, भूषण लाडवंजारी, राहुल लष्करे, सोमनाथ पाटील, सुभाष लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, राजू वाघ, रवींद्र घुगे, सुनील लाड, किशोर पाटील, नरेंद्र नाईक, भाग्येश ढाकणे, सतीश जायभाये, कमलाकर लाडवंजारी, अशोक कोष्टी, भास्कर लाड, अमोल ढाकणे, रवी सानप, जयराम पाटील, बळीराम पाटील, पप्पू पाटील, संतोष घुगे, मनोजकुमार पाटील, मयूर घुगे, दिनेश ढाकणे, शक्ति महाजन, आनंद सपकाळे, रणजित देशमुख, ऋषिकेश वाघ, राहुल सानप, योगेश नाईक, गौरव घुगे, तेजस वाघ, मोहित घुगे, वैभव वाघ, अजय सांगळे, अमोल वाघ, उज्वल नाईक, भावेश पालवे, देवेंद्र वंजारी, महेश घुगे, विशाल घुगे, राजेंद्र पाटील, अतुल वंजारी,सिद्धेश घुगे, संतोष चाटे, खन्ना पाटील, रामेश्वर पाटील, गोविंदा सांगळे, भगवान लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, किरण नाईक. सचिन इखे, अक्षय सांगळे,

तसेच संस्थेचे पदाधिकारी: अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल लाड, सेक्रेटरी प्रवीण सानप, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, कैलास सांगळे, भूषण लाडवंजारी आकाश घुगे, नितीन पाटील वंजारी, रितेश लाड वंजारी, गजानन वंजारी, कल्पेश वाघ, मिलिंद आंधळे, कृष्णा सांगळे. सौ. अर्चना नाईक, सौ. रत्नमाला घुगे पाटील, सौ. अलका नाईक, श्रीमती निर्मलाबाई पाटील, श्रीमती सरलाताई पालवे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन श्री. चंद्रकांत पन्नालाल लाड (अध्यक्ष, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण) व माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक (अध्यक्ष, जयंती आयोजन समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. जळगाव व जिल्ह्यातील समिती सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button