जळगावसामाजिक

स्व. निखिलभाऊ खडसे पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान व शालेय साहित्य वाटप

जळगाव – माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे चेअरमन स्व. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त नाथ फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिव्हिल हॉस्पिटल) जळगाव येथे बाहेरगावी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईक व गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

स्व. खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी सातत्याने कार्य केले. आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून त्यांनी रोजगारनिर्मितीस हातभार लावला होता. त्यांच्या सामाजिक कार्याच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अन्नमाता प्रतिमेचे पूजन करून अन्नदानास सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन तसेच ज्येष्ठ आघाडीचे जिल्हाध्यक्ष एस. डी. पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या प्रसंगी नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, राष्ट्रवादी युवक महानगर जळगावचे अध्यक्ष विनायक पाटील, सचिव सुनिल भैय्या माळी, माजी अध्यक्ष रिंकू चौधरी, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सहसचिव प्रविण कुलकर्णी, सुहास चौधरी, योगेश लाडवंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button