
जळगाव : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि श्री चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 13 मे 2026 रोजी जळगाव एस.टी. बसस्थानक येथे उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमात बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, उष्माघाताची लक्षणे कोणती, तसेच औषधे कशा पद्धतीने घ्यावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जळगाव बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील, स्थानक प्रमुख राजेश पांडे, खेमराज पाटील, बाबू तडवी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्षा मंगलाबाई ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. प्रदीप चौधरी यांच्यासह प्रशिक्षणार्थी नविरा शेक, विशंभर ढगे, वैष्णवी पाटील, प्रज्वल देशमुख, बिभीषण पोळे, वैष्णवी वडनेरकर, नबील खान आणि युक्ता सुरवाडे यांनी औषध वितरणात सहभाग घेतला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग तसेच रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.






