
जळगाव : समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने आज जळगाव जिल्हा पोलीस यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात रील्स तयार करणाऱ्या क्रिएटर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत फेटल अपघात, पॉक्सो कायदा, सायबर गुन्हे तसेच महिलांविषयक गुन्हे या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर रील्स तयार करण्याची सूचना व विनंती उपस्थित रील क्रिएटर्सना करण्यात आली. सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता, समाजहिताच्या विषयांवर सकारात्मक आणि माहितीपूर्ण कंटेंट तयार करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस अमित माळी, संदीपक तायडे, सुरेश राजपूत, समृद्धी पाटील, तन्वी पांडव, भाग्यश्री पाटील, याशिका किनाडा, तेजस्विनी अजय देशमुख, अक्षय नेहे, पवन भोई, आदित्य संभाजी पाटील, ऋषिकेश पवार, हरीदास काशीनाथ बोंडे, अजय कुमावत, महेश सुमे, निवृत्ती इंगळे आदी रील्स क्रिएटर्स उपस्थित होते.
यावेळी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.






