जळगावसामाजिक

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनानेच्या (IHRPDA) महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी हमिद तडवी

जळगाव – सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. संघटनेतर्फे त्यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आले असून, राज्यातील माध्यम समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे महाराष्ट्रभर संघटनेच्या मानवाधिकार, सामाजिक न्याय, शांतता आणि जनजागृतीविषयक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे तसेच अधिक प्रभावी प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार आहे. माध्यमांशी समन्वय साधत संघटनेचे कार्य व्यापक स्तरावर पोहोचविणे, विविध सामाजिक उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि मानवाधिकार विषयक जनजागृती वाढविणे, अशी महत्त्वाची जबाबदारी तडवी यांच्याकडे राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ही “मानवता, शांती, न्याय आणि समानता” या ध्येयवाक्याने कार्यरत असून, मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक सलोखा, शांतता प्रस्थापित करणे तसेच वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.

हमीद इस्माईल तडवी यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button