जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी-शिक्षकांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जळगाव : सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थी-शिक्षकांचा सराव पाठ जिजामाता माध्यमिक विद्यालयात सुरू असताना गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या ग्रुप लीडर प्रा. निधी राजेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील गीतांजली संजय, रिंकू पावरा, स्नेहा वाघ, सुशीर वाळवी, हेमांगी वाघुळदे आणि स्वप्नना सुरवाडे या विद्यार्थी-शिक्षकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुंच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगताना मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाचा जीवनात अवलंब करावा, असे आवाहन केले.

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी-शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यालयात भक्तीमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी-शिक्षक, विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button