राज्यसामाजिक

सुरेश खैरनार ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने सन्मानित

धुळे – फैजपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाडळसे गावाचे पोलीस पाटील सुरेश वामन खैरनार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनतर्फे २ ऑगस्ट रोजी धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना सुरेश खैरनार यांनी गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे, शांतता समितीच्या माध्यमातून वाद सामोपचाराने निकाली काढण्यासाठी पुढाकार घेणे तसेच विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. कोरोना काळासह विविध उत्सवांच्या वेळी त्यांनी बजावलेल्या जबाबदारीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

या सन्मानाबद्दल फैजपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, पाडळसे व परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुरेश खैरनार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या सन्मानामुळे पाडळसे गावाच्या नावलौकिकात भर पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button