जळगावशैक्षणिक

नाहाटा महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बहुविध उपयोगावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने ‘Multidisciplinary Use of Artificial Intelligence’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक होते. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. महेशभाऊ फालक, सचिव श्री. विष्णूभाऊ चौधरी आणि कोषाध्यक्ष श्री. संजयकुमारजी नाहाटा यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील तसेच फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे उपस्थित होते.

चर्चासत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. दयाघन एस. राणे आणि हर्षाराणी बऱ्हाटे (ऑस्ट्रेलिया) यांनी ‘Multidisciplinary Use of AI’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण, विज्ञान, संशोधन, उद्योग, आरोग्य, व्यवसाय, शेती तसेच दैनंदिन जीवनातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत त्यांनी माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने, सर्जनशीलतेने आणि प्रभावीपणे वापर करून भविष्यातील संधींसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रांतील उपयोग, भविष्यातील संधी तसेच बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहनभाऊ फालक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विरल वंदन वाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती चौधरी यांनी केले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. कोमल सरोदे, प्रा. वैभव पाटील, प्रा. ए. बी. पालवे, प्रा. एच. बी. राजपूत, प्रा. पी. बी. महाजन, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. प्रणिता राणे, श्री. पी. एन. सपकाळे, श्री. ए. आर. महाजन, श्री. एस. डी. तायडे, श्री. एस. पी. बावस्कर, श्री. जी. आर. चौधरी, श्री. एन. आर. पाटील, श्री. एम. ए. चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन : फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे आयोजित ‘Multidisciplinary Use of Artificial Intelligence’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक. सोबत प्रमुख वक्ते प्रा. डॉ. दयाघन एस. राणे, प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील व विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत सरोदे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button