जळगावशैक्षणिक

‘माझा बाप्पा – माझी संस्कृती’ उपक्रमातून Bappa.org विषयी जनजागृती

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने Bappa.org अंतर्गत ‘माझा बाप्पा – माझी संस्कृती’ हा उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना Bappa.org विषयी माहिती, त्यामागील उद्देश, गणेशोत्सवाशी संबंधित विविध उपक्रम तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळालेली माहिती आपल्या पालकांपर्यंत तसेच परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवून Bappa.org विषयी जनजागृती केली.

‘माझा बाप्पा – माझी संस्कृती’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाची परंपरा, बाप्पाची आरास, पारंपरिक पद्धती, नैवेद्य, आरती तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव याबाबत माहिती संकलित केली. फोटो, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील गणेशोत्सवाची संस्कृती मांडली.

यावेळी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून संस्कृती संवर्धन, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे प्रभावी माध्यम असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. ‘Bappa.org’च्या माध्यमातून गणेशोत्सवाची सकारात्मक बाजू समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

याप्रसंगी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी चैताली शरद इंदलकर आणि इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कावेरी जगदीश पाटील यांनी आपल्या घरातील पर्यावरणपूरक गणपतीची माहिती उपस्थितांसमोर सांगितली. रूपाली आव्हाड मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पर्यवेक्षिका शितल कोळी उपस्थित होत्या.

“माझा बाप्पा – माझी संस्कृती, Bappa.org ची जनजागृती – प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया!”

या संदेशातून विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सहभाग, संस्कृती संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button