*मानवी साखळी व रांगोळीच्या माध्यमातून बहिणाबाई विद्यालयात मतदान जनजागृती तर चाळीसगावात मतदानबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*


*मानवी साखळी व रांगोळीच्या माध्यमातून बहिणाबाई विद्यालयात मतदान जनजागृती तर चाळीसगावात मतदानबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*
*जळगाव शहर महानगरपालिका स्वीप अंतर्गत लोककलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती*
जळगाव दि.12 ( जिमाका )- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती (SWEEP ) उपक्रमांतर्गत बहिणाबाई विद्यालय येथे स्वीप नोडल अधिकारी तथा सहा आयुक्त मा. अश्विनी गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबिविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांची मानवी साखळी व सुंदर अशा रांगोळीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता ” प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ” हा संदेश देत उत्सव निवडणुकीचा या मतदान साक्षरता अभियानाच्या माध्यमातून बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे यांनी केले.
सुंदर रंगीत रांगोळीच्या माध्यमातून विविध परिणामकारक असे संदेश देत तसेच ‘मी मतदान करणारच’ असा संकल्प करून विविध घोषणा देत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळीच्या साह्याने प्रभावी रित्या जनजागृती अभियानचे आयोजन केले. याप्रसंगी विद्यार्थी आणि पालकांना संकल्प पत्र देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले.
यात उत्स्फूर्तपणे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, दिनेश चौधरी, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, डॉक्टर प्रतिभा राणे आणि वैशाली पाटील इत्यादींनी आगामी निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्याचा अभिनव असा संदेश दिला.
तर चाळिसगावातील डॉ काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या अनुषंगाने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघच्या लोकांमध्ये “मतदान हा आपला मुलभूत अधिकार आहे” या संबंधीची जाणिव करुन देत असताना विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात, आपले शेजारी, आपले स्नेही, आप्तेष्ट मित्रपरिवार यांना सुध्दा मतदान करण्यासाठी आग्रह धरायचा आहे. त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे. इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मतदान हा आपला मुलभूत हक्क आहे. या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यी आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू-भगिंनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यावेळी प्रतिज्ञा घेतली.
जळगाव शहर महानगरपालिका स्वीप अंतर्गत आज रथोत्सवाच्या निमित्ताने ठिक ठिकाणी गोंधळ लोककलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेपे साहेब यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विनोद ढगे आणि सहकारी यांनी लोककलेच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती केली.



