जळगावसामाजिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठी भाषा दिन सोहळा उत्साहात

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण या शाळेत कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातुन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून यावेळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ग्रंथ दिंडीचे उद्घाटन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक उपस्थित होते . ग्रंथ दिंडीमुळे मराठी भाषेच्या प्रती आदर आणि प्रेम वाढविण्यास मदत झाली. मराठमोळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मी मराठी या गाण्यावर नृत्य सादर केले. संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्रमुख, शिक्षक, आणि विद्यार्थी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकत्रितपणे काम केले. या उपक्रमामुळे मराठी भाषेच्या प्रति जागृती आणि आदर वाढविण्याचे काम केले गेले, ज्याचे समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी स्वागत केले.शेवटी, श्री संत ज्ञानेश्वर लिखित पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button