

जळगाव : जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या निमित्ताने भारतात देखील विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.या निमित्ताने एक विशेष योजना सुरू केली आहे. देशातील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “मोफत कन्या शिक्षा प्रवेश उत्सव” योजना सुरू केली आहे. सदर योजना 8 मार्च 2025 ते 15 मार्च 2025 दरम्यान प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी लागू राहील . मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी कन्या शिक्षण योजना शिक्षण योजना लागू केली आहे.सदर योजनेची उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांची जेष्ठ कन्या सौ. चैताली प्रतीक वंजारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले. सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.




