जळगावसामाजिक

संत सेना महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन, नाभिक समाजातिल ३१ ज्येष्ठ समाजसेवकांचा सपत्नीक सत्कार

जळगाव : महाराष्ट्र नाभिक महामंडळांतर्गत श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर संघटनेतर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक हर्षल मावळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख देविदास फुलपगारे तसेच श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर संघटनेचे अध्यक्ष महारू इसे उपस्थित होते.

यावेळी श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघाच्या स्थापनेपासून संघटनेच्या कार्यात विशेष योगदान देणाऱ्या ३१ ज्येष्ठ समाजसेवकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संत सेना महाराजांच्या कार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गौरव केला.

नगरसेवक विष्णू भंगाळे, किशोर सूर्यवंशी, देविदास फुलपगारे तसेच माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी संत सेना महाराजांचे विचार, समाजसंघटन आणि सामाजिक योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार महाले, अनिल निकम, मनीष कुवर, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, संजय चित्ते, पद्माकर निकम, अनिल सूर्यवंशी, विजय खोडे, राजकुमार गवळी, सुदाम कोरडे, अरुण निकम, नितीन खोंडे, अशोक वसाने, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील जगताप, प्रशांत कुवर, श्याम फुलपगारे, बापू सोनगिरे, अरुण वसाने, छगन सूर्यवंशी, संतोष खोंडे, शांताराम खोंडे, अनिल वेडीस्कर, ॲड. प्रवीण चित्ते, मधुकर निकम, विजय ठाकरे, सुभाष कुमार व किरण सोनवणे यांच्यासह समाजबांधव आणि महिलांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन खोंडे यांनी केले. प्रास्ताविक अनिल निकम यांनी केले, तर आभार मनीष कुवर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button