

जळगाव : येत्या 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, या उद्देशाने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी समता परिषदेच्या निवेदिता ताठे, भूषण महाजन, मीना महाजन, माजी नगरसेवक सुनील माळी, प्रमोद इंगळे, सुनील ताठे, नीलू इंगळे, भारती म्हस्के, रंजना सपकाळे, मीना कोळी, भाग्यश्री सोनवणे, विद्या सोनार, सपना राजपूत, मनीषा पाटील, दीपाली धनगर, चित्रा पाटील आदी उपस्थित होते.
पिंक ऑटो रिक्षा द्वारे प्रचार मोहीम
आजपासून पुढील दोन दिवस जळगाव शहरात पिंक ऑटो रिक्षांच्या माध्यमातून ओबीसी महाएल्गार मेळाव्याचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




