जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे युवती सभेची स्थापना

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी युवती सभेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे के.सी ई सोसायटी संचलित एस एस मणियार लॉ कॉलेज जळगाव. डॉ. विजेता सिंग असोसिएट प्रोफेसर, या होत्या.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांचे मानवी हक्क, मानसिक आरोग्य (Mental Health), वैवाहिक व कौटुंबिक अधिकार, पैतृक संपत्तीतील महिलांचा अधिकार, महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करणारे कायदे तसेच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयात युवती सभेची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षपदी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील, सचिवपदी प्रा. डॉ. अनिता वानखेडे, समन्वयकपदी प्रा. सुवर्ण अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रा. डॉ. जयश्री पाटील व प्रा. निधी शर्माप्रा अनिता जावे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पाटील आणि आभार प्रदर्शन कुमुदिनी तायडे हिने केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.एड.च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये महिला सक्षमीकरण, कायदेशीर हक्क आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button