जळगावआरोग्यशैक्षणिक

शारदा विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जळगाव (दि. १९ जुलै) – सुप्रीम कॉलनी येथील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शिबिरादरम्यान होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तर नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचाराची माहिती दिली. रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधे देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचेही नियोजन आहे.

शिबिरात आलेल्या नागरिकांना डॉक्टर्सकडून वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉ हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, प्राची खालसे व देवयानी चव्हाण यांनी सेवा बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, शिक्षक नितीन अटवाल, भागवत भावसार, मनीषा चौधरी व अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमाचे आयोजन कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील सर,  प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवल परदेशी, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाचपांडे व  यशवंत गुजर सर यांचे मोलाचे योगदान लाभले.  प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येईल, असे आश्वासन चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button