जळगावसामाजिक

प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय चौधरी

जळगाव – शहरातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील रहीवासी धनंजय दिलीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रदेश तेली महासंघाची बैठक नुकतीच नंदुरबार येथे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत सर्वानुमत धनंजय दिलीप चौधरी यांची युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष श्री विजय चौधरी यांचे हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, कार्याध्यक्ष विनोद चौधरी, उमेश चौधरी, चेतन चौधरी, स्वप्निल चौधरी, प्रदीप चौधरी, महिला महानगराध्यक्षा मनिषा चौधरींसह समाजबांधव उपस्थित होते.

धनंजय चौधरी यांच्या निवडीमुळे समाजातील अनेक मान्यवरांकडून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button