दातार डेव्हलपमेंट फाउंडेशन व दातार टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित ज्ञान ऊर्जा प्रकल्पाच्या व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचा समारोप


जळगाव: दातार डेव्हलपमेंट फाउंडेशन, धुळे व दातार टेक्निकल इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित ज्ञान ऊर्जा प्रकल्प व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्यांचा लाभ मिळावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ज्ञान ऊर्जा प्रकल्प अंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्रे, मेडल व ट्रॉफी देऊन व रोजगार देऊन याचा गौरविण्यात आले. प्रा.डॉ. पंडित थोरात, अरुण ढमढरे सर, समीर मन्यार, परवीन पिंजारी, फातेमा शाह, रुस्तम कुरेशी, रविन्द्र कोळपे, निलोफर पठान, फहीम पटेल, राजु भोईटे, जेहेरा शहा, जुनेद खाटीक, अमीन खाटीक, युनुस अत्तार या सर्व प्रशिक्षकांना प्रशस्तिपत्र व मॅडल देण्यात आले.
समारोप कार्यक्रमाला दातार डेवलपमेंट फाउंडेशन, धुळे व दातार इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लूकमान दातार, उपाध्यक्ष तौसीफ खाटीक, तसेच एक्सपर्ट कम्प्युटर इन्स्टिट्यूट, वडजाई रोड, धुळे येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हाजी हुसनुद्दीन साहेब, प्रमुख अतिथी युसुफ दादा खाटीक उपस्थित होते. जिल्ह्यातील धळे व जळगांव व नंदुरबार ,सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक, विविध शाळांचे प्रतिनिधी आणि प्रमुख पावने, हाजी गालीब दादा , मोहसिन पठान, फारूक अन्सारी,मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात दातार डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने सर्व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जीवनातील विविध आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील, असे प्रतिपादन लुकमान दातार सर यांनी केले. या प्रशिक्षण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व प्रशिक्षकांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.




