जळगावप्रशासकीय

जळगाव महापालिकेची मालमत्ता कर सवलत योजना – मुदतवाढ 31 मे 2025 पर्यंत

जळगाव : जळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मालमत्ता कराच्या आगाऊ भरण्यावर 10 टक्के सवलतीची योजना 31 मे 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा आयुक्त तथा प्रशासक श्री. ज्ञानेश्वर ढेरे यांनी केली असून, उपायुक्त (महसूल) श्रीमती धनश्री शिंदे यांच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाने ही माहिती जाहीर केली आहे.

सदर सवलत योजना दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आली होती. या कालावधीत, दिनांक 15 मे 2025 पर्यंत एकूण 23,342 मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेत मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केला असून, यामधून एकूण 18.29 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे.

प्रभाग समितीनिहाय जमा रक्कम पुढीलप्रमाणे:

प्रभाग समिती क्र. 1 : 6.35 कोटी रुपये

प्रभाग समिती क्र. 2 : 2.63 कोटी रुपये

प्रभाग समिती क्र. 3 : 3.86 कोटी रुपये

प्रभाग समिती क्र. 4 : 5.45 कोटी रुपये

शहरातील नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अजूनही अनेक मालमत्ता धारकांनी मुदतवाढीची मागणी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत 31 मे 2025 पर्यंत वाढवली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सदर सवलतीचा लाभ केवळ 31 मे 2025 अखेरपर्यंतच दिला जाणार आहे. त्यामुळे जळगाव शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व मुदतीत आगाऊ कर भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे व उपायुक्त (महसूल) श्रीमती धनश्री शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button