

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक १५ जानेवारी रोजी मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र . प्रा . डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील , सहा .प्राध्यापक निधी शर्मा , सुवर्णा अहिरे , श्री पंकज वाघ , श्री अरविंद पवार , उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जयश्री पाटील यांनी केले .प्रास्ताविकातत्यांनी मकर संक्रांत का साजरी करतात व मकर संक्रांतीचे तीन दिवस जसे भोगी , मकर संक्रांत आणि किंक्रांत या दिवसाचे महत्त्व काय तसेच वाण देण्यामागचा उद्देश व ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली . यानंतर
महाविद्यालयातील महिला प्राध्यापक वृंद तसेच प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थिनी शिक्षिका मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थिनी शिक्षकांना वान व हळदीकुंकू तसेच तिळगुळ देऊन हा कार्यक्रम आनंदाने साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक मिनिट स्पर्धा घेण्यात आला त्याच्यामध्ये एका मिनिटात कोण जास्त उखाणे घेतो . त्यानंतर संगीत खुर्ची ,फुगे फोडणे असे खेळ घेण्यात आले व आनंद साजरा करण्यात आला .त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे यांनी आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपण हे सण उत्सव साजरे करतो त्याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रम घेण्यासाठी प्रा . डॉ . नारायण खडके यांनी परवानगी दिली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. अनिता जावे,डॉ. जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक यांचे सहकार्य लाभले .




