

बोदवड : अवर्षण आणि अतिवृष्टीच्या दुहेरी संकटामुळे बोदवड तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव दादा पाटील व शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद धामोडे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
यावेळी निवेदनात नमूद करण्यात आले की, चालू खरीप हंगामात मक्याचे व कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. 🌾
या प्रसंगी विष्णु राणे, मुकेश राऊत, गजानन पाटील, पुंडलिक मुसळे, अमोल पाटील, बंटी पाटील, घनश्याम इंगळे, दिग्विजय पाटील आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
👉 शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शिवसेना बांधिल – उद्धव दादा पाटील
माजी जि.प. सदस्य उद्धव पाटील यांनी सांगितले की, “बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पिक विमा दावे मंजूर करून दिले गेले पाहिजेत.




