जळगावसामाजिक

लोकशाही पत्रकार महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी पत्रकार हमीद तडवी यांची सर्वानुमते निवड! 

रावेर – पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोकशाही पत्रकार महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निर्भीड व रोखठोक युवा पत्रकार, पोलीस टाईम चे मुख्य संपादक, दैनिक वचक लोकशाहीचे पत्रकार हमीद तडवी यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

लोकशाही पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष निवृत न्यायाधीश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतापराव साळुंखे, राष्ट्रीय महामंत्री टी. माधव, प्रदेशाध्यक्ष किशोरदादा पवार,

राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. डी जाधव राष्ट्रीय संघटनमंत्री तथा दैनिक लोकनेताचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत, राष्ट्रीय सरचिटणीस हलिमा शेख, राष्ट्रीय महासचिव आयेशा मुलानी,

महाराष्ट्र डिजिटल मीडिया अध्यक्ष महेबूब शेख, राज्य महासचिव चंद्रशेखर बनसोडे या सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या मंजुरीने ही निवड जाहीर झाली आहे.

२१ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले हमीद तडवी यांनी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध सतत वाचा फोडत सत्य पत्रकारिता केली आहे.  तडवी यांच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. लोकशाही पत्रकार महासंघ भारत या संघटनेला संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत आणि पत्रकारांच्या अडचणी सोडण्याचे कार्य करण्याची जबाबदारी स्विकारली असल्याचे पत्रकार हमीद तडवी यांनी सांगितले,पूर्ण मेहनतीने, विश्वासाने,इमानदारीने संघटनेचे कार्य करण्याचेही हमीद तडवी यांनी सांगितले. पत्रकार हमीद तडवी यांच्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रात ही महत्वपूर्ण निवड लोकशाही पत्रकार महासंघाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button