जळगावशैक्षणिक

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन

जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन *प्रा. डॉ. बालाजी राऊत ( मु. जे. महाविद्यालय मानसशास्त्र विभाग )* यांच्या हस्ते करण्यात आले, यौवनात पदार्पण करताना या विषयावर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते म्हणाले किशोर वयात येताना त्यांच्यात होणारे अंतर्गत बहिर्गत शारीरिक आणि भावनिक बदल होताना येणाऱ्या समस्या, अशा समस्यांना कसे सकारात्मक होऊन सामोरे जायचे या संदर्भात विद्यार्थिनीशी सुसंवाद साधून त्यांचे शंकांचे निरसन केले आणि विद्यार्थिनींकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन आणि पर्यवेक्षिका शिल्पा सरोदे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभेच्या अध्यक्षा प्रा. मीनल पाटील त्यांनी केले,त्यांनी युवतींच्या विविध कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या शैक्षणिक आणि स्वास्थ्य संदर्भातील अडचणींवर मात करण्यासाठी ही समिती वर्षभर कार्यरत राहील याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी अत्तरदे यांनी केले. तसेच फलक लेखन प्रा.छाया पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button