
बांभोरी – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सामाजिक चळवळीला प्रेरणा देणारी ठरते त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी बांभोरी प्रचा ग्राम पंचायत व भीम ज्योत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा बांभोरी प्रचा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चे वाटप करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले असून दरवर्षी हा अनोखा उपक्रम बांभोरी प्रचां येथे आयोजित केला जातो. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही सुमारे 200 विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तक, पेन इ. साहित्य सरपंच सचिन बिऱ्हाडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश नन्नावरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी बांभोरी प्रचां ग्रामपंचायत चे सरपंच श्री सचिन बिऱ्हाडे, मुख्याध्यापिका सौ माया आमोदकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.जगदीश नन्नावरे, श्री.रवींद्र सोनवणे सर, श्री.नानेश्वर साळवे सर, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र, विचार, कार्य या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. न्यानेश्वर साळवे सर यांनी केले. तसेच
श्री.पाटील सर, सौ.ठाकूर मॅडम, सौ.जानवी साळुंखे मॅडम, तसेच भीम ज्योत मित्र मंडळ चे श्री.महेश बनसोडे, प्रदीप साळुंखे, पैलेश सपकाळे यश सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.






