जळगावआरोग्यसामाजिक

राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंती निमित्त मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान

डॉ.परिक्षीत बाविस्कर व आरुश्री हॉस्पिटल टिमने केली आरोग्य तपासणी, मार्गदर्शन,औषधोपचार 

जळगाव – राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे विशेष मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम प्रथितयश डॉ.परीक्षित बाविस्कर, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापक सौ. गायत्री पाटील, जिल्हा रुग्णालय मानसिक आरोग्य विभागाचे दौलत निमसे यांच्या शुभहस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची प्रतिमा पूजन सोबत झाडू पूजन,स्वच्छता करत, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन म्हणत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार, सेवाकार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान यावर मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी माहिती दिली. तर डॉ. परीक्षित बाविस्कर, सौ.गायत्री पाटील, दौलत निमसे यांनीही मनोगत मांडले.

येथील लाभार्थी असलेले ज्येष्ठांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर, मार्गदर्शन, तपासणी अरुश्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल टीम द्वारा डॉ.परिक्षीत बाविस्कर, डॉ.शाहरुख खान आदींनी करून शक्तीवर्धक, हाडांच्या मजबुती तसेच उच्च रक्तदाब असलेल्यांना औषधी दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनी तर आभार समाजकार्य महाविद्यालयाच्या काजल चौधरी यांनी केले. कार्यक्रमास काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ शितल काटे, समाजकार्य महाविद्यालयचे अश्विनी बिलकूले, रेवती चौधरी, साक्षी मोरे, तेजस चव्हाण, राजेंद्र कोळी, वैभव निकुंभ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button