राज्यकृषी

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

यंदाच्या सन २०२६ खरीप हंगामातील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील पिके करपू लागल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज राज्यातील 358 तालुक्यापैकी

२६५ तालुक्यांमध्ये ‘Trigger-१’ अर्थात ‘पहिली कळ मुख्यमंत्री यांनी दुष्काळ जाहीर केला आहे. या निकशात शासनाकडून विविध उपाययोजना व सवलती! जाहीर करण्यात आल्या ज्यामध्ये दुष्काळ ग्रस्त भागातील शतकऱ्यांच्या

जमीन महसूलात सूट,

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स चा वापर, पीक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट ( 7.5 हॉर्स पॉवर च्या पंपांचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहेत. त्यावरील पंपाना सदर सूट लागू असेल. ), शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,

रोहयो अंतर्गत कामाच्या निकशात शिथलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, टंचाई जाहीर झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज वाहिनी खंडित नकरणे, शेतीवर आश्रित शेतकरी, मजूर इत्यादीना अन्न धान्याची टंचाई भासणार नाही यासाठी उपाय योजना करणे, जनांवरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल यासाठी उपाय योजना करणे, जल संधारणाची कामे सुरु करणे, अगोदरच निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णया नुसार पिण्याचे पाण्याची उपाय योजना करणे. आदींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील

75% भागात दुष्काळी परिस्थिती असल्याच चित्र दिसून आले. ज्यात 265 तालुके दुष्काळाने बाधित असून यात जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्याचा समावेश आहे. ✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button