
मेहरुण : दीपावली पर्वातील वसुबारस हा सण भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मा.नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी पत्नीसमवेत गंगागौरीचे विधिवत पूजन केले.
वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. हिंदू संस्कृतीत गायीला मातेचे स्थान असून, तिचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. यानिमित्ताने प्रशांत नाईक व त्यांच्या पत्नीने गंगागौरीची पूजा, आरती करून आशीर्वाद घेतले.
आधुनिक काळातही भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा वारसा जपण्याचा संदेश या पूजनातून देण्यात आला. वसुबारसच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.






