

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण याबद्दल विद्यार्थी व पालकांना जागरूक करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देशी बियाणे शाळेच्या इको क्लब तर्फे चालविण्यात येणाऱ्या सीड बँक मध्ये जमा केल्यास फी मध्ये सवलत योजना सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून, “शैक्षणिक फी न घेता देशी बियाणे” जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचे सांगितले आहे.तसेच इको क्लब मध्ये शाळकरी मुलांच्या कामगिरी बद्दल कौतुकही केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानले.सीड बॅंकेतून पैसे मिळवणे, हा आमचा उद्देश अजिबात नाही. केवळ देशी बियाण्यांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार हाच आमचा अजेंडा आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हेही एक प्रकारचे प्रोत्साहनच आहे. असे प्रशांत नाईक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.




