जळगावसामाजिक

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात एटीएम मशीनचे उद्घाटन

जळगाव : जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या एटीएम सुविधेचे उद्घाटन बुधवारी (दि. ८ जुलै) सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती गवई यांनी न्यायालय हे सर्वप्रथम पक्षकारांसाठी असून त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. न्यायालय आणि वकिलांमध्ये परस्पर सलोखा व समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालय परिसरात एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे पक्षकार, वकील आणि कर्मचाऱ्यांची मोठी सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी न्यायमूर्ती गवई यांनी जळगाव जिल्हा वकील संघाच्या कक्षाला भेट देऊन उपस्थित वकिलांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेच्या फलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जळगाव जिल्हा न्यायालयातील अन्य न्यायाधीश, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सागर चित्रे, जिल्हा सरकारी वकील, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायालय परिसरात सुरू झालेल्या या नव्या एटीएम सुविधेमुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची आर्थिक व्यवहारांची सोय अधिक सुलभ होणार असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button