जळगावसामाजिक

सर्वोच्च गोलोकातून आलेली कामधेनु गोमातच कलियुगातील कल्पवृक्ष – साध्वी कपिला दिदी.

जळगाव — पांजरापोळ गोसंस्थेत दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान पाच दिवसीय गौकथेला उत्साहात सुरवात झाली असून आज दुसऱ्या दिवसीय गोमाता प्रकटीकरण कथेत साध्वी कपिला गोपाल सरस्वती दिदी यांनी सर्वोच्च अशा ईश्वरीय निवास असलेल्या गोलोका बद्दल पुरणातील दाखले देऊन माहिती सुंदर माहिती दिली.

पंचगव्य आणि गौउत्पादनापासून निर्मित सार साहित्य घराला,परिवाराला पूर्णतहा निरोगी करू शकण्याच सामर्थ्य फक्त गोसेवतच असून पितरांना तर्पण देताना गाईच्या खुराला ज्या ठिकाणी स्पर्श होते तेथील माती व पाणी,काळे तिळ घेऊन अंगठ्याच्या धारेने पितरांना फक्त पाणी दिलं तरी पितृ पूर्ण तृप्त होऊन आशीर्वाद देतात.

गोमाता जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समाजाची, राष्ट्राची निरपेक्ष सेवा करत असते आपल्या बछड्याच दूध सोडून परिवारास दूध पुरवते. गरुड पुराणानुसार मृत्यू पश्चात आप आपल्या कर्मा नुसार खडतर वैतरणी नदीचा प्रवास चारशे योजन म्हणजेच सोळाशे कोस म्हणजेच अठ्ठेचाळीसशे किलो किलोमीटर प्रवास करावा लागतो तो प्रवास गोमाता पवित्र आत्म्यास ,गोसेवाकास आपल्या शेपटीने सहज पार करवून नेते.

आज सोशल मीडियाच्या युगात आपण आपले आई वडिलांची सेवा सोडून नको ते करत आहोत,लव जिहाद सुद्धा धोकादायक झाले असताना सनातन हिंदू धर्माची संस्कृती टिकवणे काळाची गरज आहे.

उद्या 13 नोव्हेंबर* गुरुवार रोजी गोमातेला *चुनरी* (सुंदर ओढणी) *चढवण्याचा कार्यक्रम* शहरात प्रथमच होत असून नागरिकांनी या पावन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button