जळगावआरोग्य

संत ज्ञानेश्वर विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (दि. २० सप्टेंबर २०२५): श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मेहरूण व रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी आरोग्य तपासणी केली, तर नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी केली. शिबिरात निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची घोषणा करण्यात आली.

शिबिरादरम्यान १२ वर्षांवरील किशोरवयीन विद्यार्थिनींना डॉ. अमिता श्रीवास्तव व प्रशिक्षणार्थी डॉ. प्राची खलसे यांनी मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमात कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉ प्राची खलसे, भावना दातीर, हषदा पाटील, श्रद्धा चौधरी, फैज खान आदींनी सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. नवल परदेशी, आकाश सोनावणे व शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे आश्वासन कॉलेज प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button